#कुस्तीसम्राट पै .#युवराजपाटीलतात्या (#कोल्हापूर)
यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताब मिळविला होता, हे तर जगजाहीर आहेच पन आज पर्यत हा रेकॉर्ड कोनत्याही पैलवानाला मोडता आला नाही हे विशेष आहे.
1975 ते 1986 हा काळ पै. युवराज पाटील यांनी खर्या अर्थाने गाजवून सोडला .
1978 च्या दरम्यान , उत्तरेकडून दिल्लीचा प्रसिद्ध मल्ल सतपालसिंग वारंवार कोल्हापूरच्या मल्लांना कोल्हापूरकराना कुस्ती खेळण्यास जाहीर आव्हान देत होता.
पै. सतपालला बेळगाव मुक्कामी 1977 ला रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामानी चारीमुंड्या चित केले तरी पन तो संपूर्ण भारतात त्याला कोणीच प्रतिस्पर्धी राहीला नाही अशी वल्गना करत राहीला. आणि एप्रिल 1978 साली युवराज आणि सतपाल कुस्ती ठरली.
पै. युवराज पाटील यांनी ती कुस्ती मारली पण पै. सतपाल आणि त्याचे गुरू हनुमानसिंग यांनी रडीचा डाव केला .
निर्णय अमान्य करून मैदान सोडले आणि दिल्लीत जाऊन पून्हा कोल्हापूरकराना जाहीर आव्हान दिले .
पून्हा हीच कुस्ती सन 1981 ला कराड मुक्कामी झाली .
पून्हा युवराजने कुस्ती मारली .
युवराजच्या चाहात्यानी त्वरित युवराजला उचलून मैदानातच जल्लोश केला .
याच संधीचा पुन्हा सतपालने फायदा घेऊन निकाल अमान्य करून पून्हा दिल्लीत जाऊन वारंवार कोल्हापूरच्या पैलवानांना आव्हान देऊ लागला .
ही बाब सर्वच कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागली आणि पून्हा एकदा युवराजने हे आव्हान स्विकारले .
11फेब्रुवारी 1984 ला कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध खासबाग मैदानात हि कुस्ती घेतली गेली..
त्या मैदानाची देशभर अशी जाहीरात झाली की
"भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान कोण?
दख्खन का युवराज कि उत्तरचा सतपाल...
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे या कुस्ती कडे लक्ष लागून राहीले, कोल्हपूरच्या जनतेनही ही गोष्ट खुपच मनाला लावुन घेतली होती..
या कुस्तीची जाहीरात आज पर्यत अशी झाली नाही... एवढ्या मोठ्या प्रमाणात करन्यात आली होती...
त्यात स्वतः हाच्या कुस्तीची जाहीरात कोल्हापूरच्या रस्त्याने करनारा एकमेव पैलवान युवराज तात्या होय....
त्यावेळचा हा दुर्मिळ फोटो.. 💖
या मधे कुस्ती सम्राट पै. युवराज पाटील तात्या हे
स्वतःहा अँबेसिटर गाडी घेऊन त्यावर दोघाचे कटआऊट बनवुन माईक वरुन कुस्तीची जाहीरात करत फिरत होते...
एवढा जबरदस्त आत्मविश्वास असलेला कोल्हापूरच्या मातीत तयार झालेला अस्सल पैलवान युवराज पाटील...
कुस्ती बगायला खासबाग मैदानात लोकाचा महापुर लोटला होता...
जेवढे पब्लिक आत मैदानात होते ,त्यापेक्षा जास्त पब्लिक बाहेर फिरत होते..
मिळेल त्या जागेमधून कुस्ती याची देही याची डोळा बगायचं भाग्य मिळावं म्हनुन टिकीट काढून मैदानाच्या आवती भोवती रेंगाळत होते...
कुस्ती मैदानाला सुरूवात झाली..
सर्व मान्यावर, कुस्ती क्षौकिंनांच्या साक्षिने पुन्हा एकदा पैलवान. युवराज पाटील यांनी महाबली पैलवान सतपाल सिंग ला चारीमुंड्या चित केले...
यावेळी मात्र सतपाल व त्यांच्या गुरूनी कुस्ती चितपट झाली हे मान्य केलं
त्यावेळी कोल्हापूर मधे पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली होती...
पैलवान युवराज पाटील यांची हत्तीवरुन मिरवनुक काढली होती.
सार्या कोल्हापूरात साखर पेढे वाटवे जात होते .
कोल्हापूरवर आलेला कलंक पै. युवराज पाटील यांनी मिटवला होता...
सलग तिन वेळा पै. सतपालला चारिमुंड्या चितपट केल्यामुळे पै. युवराज पाटील यांना #कुस्तीसम्राट हा किताब बहाल करन्यात आला होता...
👑💪👑💪👑💪👑💪👑💪👑
धन्यवाद.. 🙏
जय हिंद.. 🇮🇳
पै. संग्राम कांबळे.. 👮
कुस्ती मल्लविद्या 💐💪
Tags: